PM Modi mother Heeraben Modi dies at age of 100: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदींनी अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींनीच आपल्या आईच्या निधनासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली. आईचा एक फोटो शेअर करत मोदींनी ही माहिती दिली. हिराबेन मोदींच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर अनेक मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. हिराबेन मोदींना श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही या दु:खद प्रसंगी मोदींसोबत असल्याचं अगदी सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यासहीत अनेकांनी आपल्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत. कोण काय म्हणालं आहे पाहूयात..

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ट्विटरवरुन हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याचे समजलं. ही अतिशय दु:खद घटना आहे. त्या प्रेमळ व मनमिळाऊ वात्सल्यमूर्ती होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यांनी देशाला महान सुपुत्र दिला. त्या कृतार्थ जीवन जगल्या. ईश्वर दिवंगत श्रीमती हिराबेन यांच्या आत्म्याला श्रीचरणी स्थान देवो, ही प्रार्थना करतो. माझ्या शोकसंवेदना पंतप्रधान मोदींबरोबर आहेत,” असं कोश्यारींनी म्हटलं आहे.

hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त करताना, “पंतप्रधान मोदींच्या आई हीराबा यांच्या निधनाची बातमी फारच दु:खदायक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आई ही पहिली मित्र आणि गुरु असते. तिला गमावण्याचं दु:ख नक्कीच संसारामधील सर्वात मोठं दु:ख असतं,” असं म्हटलं आहे. अन्य एका ट्वीटमध्ये, “हीराबा यांनी ज्या पद्धतीने आव्हानांना तोंड देत कुटुंबाचं पालन पोषण केलं ते आदर्श घेण्यासारखं आहे. त्यांचं त्यागपूर्ण आणि तपस्व्यासारखं जीवन नेहमीच आमच्या आठवणींमध्ये कायम राहणार आहे. संपूर्ण देश दु:खाच्या या प्रसंगी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. कोट्यावधी लोकांच्या प्रार्थना तुमच्याबरोबर आहेत,” असं अमित शाह म्हणाले.

आणखी वाचा – नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली

“एका मुलासाठी आई म्हणजे संपूर्ण जग असतं. आईच्या निधानामुळे मुलाला सहन करता न येणारी आणि कायम अपूर्णत्वाची जाणीव करुन देणारी हानी होते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं निधन होणं ही फार वेदनादायक घटना आहे. प्रभु श्री राम दिवंगत पुण्यात्म्याला आपल्या चरणांशी स्थान देवो”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Video: मोदींना मातृशोक! हिराबेन यांच्या पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार; मोदींनी रुग्णवाहिकेतून केला प्रवास

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही माझ्या सद्भावना या मोदी कुटुंबियांबरोबर असल्याचं सांगत हिराबेन मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरुन मोदींच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रीजूजू यांनीही ट्विटरवरुन हिराबेन मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.