भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. त्याआधी त्यांनी अमेरिका आणि इतर काही देशांच्या राज्यांच्या आणि कंपन्यांच्या प्रमुखांनाही भेट घेतली आहे. अमेरिका दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना काही विशेष भेटवस्तू दिल्या. कमला हॅरिस यांच्या व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भेटवस्तू देखील दिल्या. या सर्व भेटींचा काशीशी विशेष संबंध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना आजोबा पीव्ही गोपालन यांच्याशी संबंधित जुन्या सूचनांशी संबंधित हस्तकला असलेली लाकडी फ्रेमची प्रत दिली आहे. एक सरकारी अधिकारी म्हणून, पीव्ही गोपालन यांना सेवा कालावधीत त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी ही चौकट देण्यात आली होती.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!
Pakistan former Prime Minister Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, १४ वर्षांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना गुलाबी एनामेल बुद्धिबळ संच देखील भेट म्हणून देण्यात आला आहे. हा बुद्धिबळ जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेल्या काशीच्या हस्तकलेशी संबंधित आहे. पंतप्रधान मोदी हेसुद्धा काशीमधून निवडून आलेले खासदार आहेत.

या बुद्धिबळ संचावर हस्तकला करण्यात आली आहे. तर त्याचे तेजस्वी रंग काशीचे चैतन्य प्रतिबिंबित करतात. गुरुवारी, पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये दीर्घ चर्चा केली आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी, कोविड -१९ आणि इतर जागतिक समस्यांना सामोरे जाणार असल्याचे म्हटले.

यानंतर पंतप्रधान मोदींनी इतर क्वाड नेत्यांचीही भेट घेतली. मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना चांदीचे मुलामा चढवलेले जहाज भेट दिले. ही हस्तकला काशी शहराची प्रगती दाखवते.

पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. पंतप्रधान म्हणाले की भारत आणि जपानला एकत्र आणण्यात बौद्ध धर्माची मोठी भूमिका आहे. भगवान बुद्धांचे विचार जपानची संस्कृतीत प्रतिबिंबित आहेत. जपानच्या यापूर्वीच्या दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी तेथील बौद्ध मंदिरांनाही भेट दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे. कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.