राष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्प अर्पण करून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अाडवणींनीसह सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्प अर्पण करून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि लालकृष्ण अाडवणींनीसह सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली आहे. राज्यासह देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे आले आहेत. दादर शिवाजीपार्कचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm modi president pay tribute to b r ambedkar on his 60th death anniversary

ताज्या बातम्या