हिंदी चित्रपसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लहरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती. या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

हेही वाचा – Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

दरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले.