रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या शेजारी बसले होते. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या शेजारील देशांतील नेत्यांनी राष्ट्रपती भवनातील मेजवानीला हजेरी लावली होती.

काही महिन्यांपूर्वी भारत आणि मालदीव या दोन्ही देशांत शाब्दिक युद्ध रंगले होते. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधील काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने हे प्रकरण वाढलं होतं. त्यामुळे या दोन्ही देशांतील नातेसंबंध बिघडले होते. परंतु, मोदी पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानी सोहळ्यालाही मुइज्जू हजर राहिले होते.

या मेजवानी सोहळ्यात मुइझ्झू पंतप्रधान मोदींच्या डाव्या बाजूला बसले होते, तर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे त्यांच्या उजव्या बाजूला बसले होते. त्यानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर. राष्ट्रपती मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीनंतर राष्ट्रपती मुइझ्झू यांनी भारतीय पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

मालदीव आणि भारत यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली होती. तसंच, काही वर्षांपूर्वी भारताने मालदीवला अनेकदा आर्थिक मदत केल्याने त्याचे ऋणही मालदीवर आहे. त्यामुळे या ऋणातून मुक्ती मिळावी यासाठी मालदीवकडून प्रयत्न सुरू होते. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या मेजवानीला कोण आलं होतं?

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिलेल्या शेजारील देशांच्या नेत्यांसाठी राष्ट्रपती भवनात मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. मेजवानीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा समावेश होता; मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू; सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ; बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना; मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ; नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड; आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.