PM Narendra Modi criticizes the opposition’s conduct regarding national development efforts : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत टीकलं नाही. विरोधकांच्या एकजुटीमुळे विधेयक संमत करण्यास लागणारे संख्याबळापर्यंत सरकारला पोहोचता आलं नाही. परिणामी हे विधेयक मंजूर झाले नाही. यामुळे केंद्र सरकारवर नामुष्की ओढावली आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करून या विधेयकांविरोधात मतदान करणाऱ्या पक्षांवर ताशेरे ओढले. तसंच, काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी महिलांच्या स्वप्नांची भ्रूणहत्या केली अशा शब्दांत टीका केली.

“काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांचं नुकसान झालं आहे. देशातील कोट्यवधि महिलांची नजर संसदेवर होती. देशाची नारीशक्ती पाहत होती, मलाही हे पाहून खूप दुःखं झालं की नारीहिताचा प्रस्ताव पडला तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि सपासारखी घराणेशाही पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांपासून त्यांचे अधिकार हिरावून घेत हे पक्ष बाके वाजवत होते. त्यांनी फक्त बाके वाजवले नाहीत, त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. महिला सर्व विसरू शकतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी संसेदत केलेला व्यवहार महिला कधीच विसरणार नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्ष भ्रूणहत्येचे गुन्हेगार

“नारी शक्ती वंदन विधेयक उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व राज्यांच्या समान तुलनेत जागा वाढणार होत्या. या विधेयकात सर्व राज्यांच्या आवाजाला अधिक शक्ती देण्याचा प्रयत्न होता. राज्य लहान असो वा मोठं असो, लोकसंख्या कमी असो वा जास्त; सर्वांची समान शक्ती वाढवण्याचा प्रयत्न होता. परंतु, या प्रामाणिक प्रयत्नांची काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी संसदेत सर्वांसमोर भ्रूण हत्या केली आहे. काँग्रेस, टीएमसी, डीएमकसे, समावजवादी पार्टी हे भ्रूण हत्येचे गुन्हेगार आहे. हे देशाच्या संविधानाचे गुन्हेगार आहे. देशातील नारीशक्तीचे गुन्हेगार आहे. काँग्रेसला महिला आरक्षणाच्या विषयाचाच तिरस्कार आहे. त्यांनी पूर्वीपासूनच महिला आरक्षण रोखण्यासाठी षडयंत्र आखले आहेत”, असंही मोदी म्हणाले.