PM Modi statement on Iran war : जागतिक स्तरावर युद्धाचे ढग गडद झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी भारताबरोबर आहे” असे म्हणत त्यांनी शांतता आणि सुरक्षेच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेले हे विधान भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, जागतिक नेत्यांचे याकडे लक्ष वेधले गेले आहे. ते आज टीव्ही ९ नेटवर्कच्या कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “असं एकही वर्ष नाहीय जिथे भारताची आणि भारतीयांची परीक्षा घेतलेली नाही. पण १४० कोटी देशावासियांच्या एकजूटीच्या प्रयत्नांनी भारताने प्रत्येक संकटाला तोंड दिलं आहे. आता युद्धाच्या परिस्थितीतही भारताची नीती आणि रणनीती पाहून भारताचं सामर्थ्य पाहून जगातील अनेक देश हैराण आहेत.”
भारत जगभरातील देशांचा विश्वासू भागीदार
“आमच्या येथे म्हण आहे की साँच को आँच नही’ (खऱ्याला मरण नाही). २८ फेब्रुवारपासून जे सुरू आहे, त्या कठीण परिस्थितीतही भारत प्रगतीच्या विकास आणि विश्वासाबरोबर पुढे जात आहे. या २३ दिवसांत भारताने रिलेशनशिप कॅपिसिटि, डिसिजन कॅपिसिटी आणि क्रायसेस मॅनेजमेंट कॅपासिटी दाखवली आहे. जग इतक्या मोठ्या संकटात सापडलेलं आहे. तरीही भारताने अभूतपूर्व आणि अकल्पनीय ब्रिजेस बनवले आहेत. आखातापासून पश्चिम देशांपर्यंत आणि ग्लोबल साऊथपासून शेजारी देशांपर्यंत भारत सर्वांचा विश्वासू भागीदार आहे”, असंही मोदी म्हणाले.
आम्ही भारताच्या बाजूने
ते पुढे म्हणाले, “काहीजण विचारतात की आम्ही कोणाबरोबर आहोत? तुम्हाला माझं उत्तर हेच आहे की आम्ही भारताबरोबर आहे. आम्ही भारताच्या हिताबरोबर आहोत. शांतीबरोबर, संवादाबरोबर आहोत. संकटच्या याच वेळी जागतिक पुरवठा साखळी कोलमडलेली असताना, भारताने डायवर्सिफिकेशन (विविधीकरण) मॉडेल सादर केलं आहे. ऊर्जा, फर्टिलायजेशन किंवा महत्त्वाच्या वस्तूंबाबत भारताने मॉडेल तयार केलं आहे. आपल्या नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा याकरता भारताने सातत्याने प्रयत्न केला आहे. आजही तेच करत आहेत.”
