“…म्हणून २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींची हकालपट्टी होणार”; लालू प्रसाद यादवांचं मोठं विधान

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का याविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचं मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलं आहे. त्यासोबतच त्यामागचं कारणही सांगितलं आहे. पुढचे पंतप्रधान कोण होतील याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.

शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांनी द क्विंटला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. मोदींची पदावरुन हकालपट्टी होईल असं म्हणतानाच त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, “देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये हकालपट्टी होईल”.

पुढचा पंतप्रधान कोण असेल, असे विचारले असता लालू म्हणाले की, यावर नंतर चर्चा केली जाईल. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. लालू म्हणाले की, सर्व समविचारी पक्ष आणि यूपीएच्या सर्व मंत्र्यांनी भेटून चर्चा करावी. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

लालूंनी त्रिपुरामधील अशांतता की केवळ दुष्प्रचार असल्याचं सांगितलं आहे.

“ते समाजात जातीयवाद पसरवत आहेत. त्यांना (भाजपा) जातीयवादामुळे निवडणुकीत फायदा होत राहील आणि सत्ता मिळत राहील, असे वाटते. जेव्हा मॉस्को (रशिया) येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तेथील लोकांनी उद्ध्वस्त केले. मी संसदेत बोललो. विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथे जाऊन का थांबवत नाहीत? ते फक्त त्यांच्याच घरातले सिंह आहेत, गरीब मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आघाडीवर आहेत,” ते म्हणाले.

लालू यादव म्हणाले की, सरकार सर्व काही खासगी कंपन्यांना देत आहे; ते लोक (उद्योगपती) काहीही मागतात, सरकार त्याचा लिलाव करते. रेल्वे खासगी क्षेत्राला देण्यात आली. “तुमच्याकडे ट्रेनमध्ये टॉवेल आणि चादरही उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता तुम्ही घरून जेवण, ब्लँकेट, चादर घेऊन प्रवास करा. सरकारने सर्व काही संपवले आहे”, असं ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi will be ousted in 2024 says rjd president lalu prasad yadav vsk

ताज्या बातम्या