G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रोमला रवाना; १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत.

modi
(फोटो – ट्विटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील. “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे, असं इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितलं. रोमला पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देतील आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेणार आहेत.

G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या इटली भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ते रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील. मोदी २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलतील.”

“रोममध्ये, मी १६व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन. तिथे मी इतर G20 नेत्यांसोबत जागतिक आर्थिक आणि आरोग्य पूर्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यांवर चर्चा करेन,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi will reach rome for g20 summit hrc

ताज्या बातम्या