पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादीमीर पुतिन आणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात सहमती झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला, असं मोदी म्हणाले.

२१व्या शतकात भारत जागतिक नेतृत्वासाठी सज्ज

भारत आता जागतिक नेतृत्वासाठी इच्छुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. “भारत सध्या सर्वोत्तम होण्याचा, सर्वाधिक यश मिळवण्याचा आणि सर्वोच्च यश गाठण्याचा प्रयत्न करत आहे”, असं मोदींनी यावेळी नमूद केलं.

pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Pooja Khedkar viral mock interview
Pooja Khedkar : आई-वडील विभक्त, तर ‘या’ विषयांत अभ्यास संशोधन; पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्यूमधून अनेक खुलासे, VIDEO व्हायरल!
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray
Swami Avimukteshwaranand : ‘विश्वासघातकी लोक हिंदू कसे?’, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा घणाघात; म्हणाले, “उद्धव ठाकरे पुन्हा..”
pooja khedkar ias mother manorama khedkar viral video
आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!
Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…

“गेल्या हजारो वर्षांपासून भारतानं आपलं ज्ञान आणि कौशल्य जगभरात इतरांना दिलं आहे. आपण जगाला युद्ध दिलेलं नाही, तर बुद्ध दिला आहे. भारतानं नेहमीच जगाला शांतता आणि समृद्धी दिली. त्यामुळे २१व्या शतकात भारत जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे”, असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिएन्नामधील भारतीयांसमोर व्यक्त केला.

४१ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियामध्ये

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. “हा भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दौरा आहे. इतक्या वर्षांपासूनची ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक क्षणी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या मैत्रीची ७५ वर्षं पूर्ण करत आहेत”, असं मोदी म्हणाले.

भारत आणि ऑस्ट्रियामधील साम्य

“भारत आणि ऑस्ट्रिया भौगोलिकदृष्ट्या दोन टोकाच्या ठिकाणी आहेत. पण आपल्यामध्ये अनेक साम्यदेखील आहेत. दोन्ही देशांना लोकशाही बांधून ठेवते. स्वातंत्र्य, समता, विविधता आणि कायद्याचा सन्मान ही मूल्य दोन्ही देशांसाठी समान महत्त्वाची आहेत. आपले समाज बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक आहेत. दोन्ही देशांमध्ये विविधता दिसून येते. ही सर्व मूल्य दोन्ही देशांमधल्या निवडणुकांमध्ये परावर्तित होत असतात”, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

PHOTOS : पंतप्रधान मोदींचे युरोपातून अमेरिकेला उत्तर; पाकिस्तानलाही दिला इशारा!

द्वीपक्षीय सहकार्यावर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा

ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वॅन डेर बेलन आणि चॅन्सेलर कार्ल नेमर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील द्वीपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यासंदर्भात सहमती झाली. यात पर्यावरण संरक्षणासंदर्भातला मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. त्याशिवाय, युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावासंदर्भातही दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली.