ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे

अमिताभ बच्चन यांना टाकले मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सध्या चांगलेच गाजत आहेत. कारण ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणा-या भारतीयांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत. मोदींचे ट्विटरवर २ कोटी २१ लाख एवढे फॉलोअर्स आहेत.  आतापर्यंत अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते, परंतु अमिताभ यांना मागे टाकत मोदी एक नंबरवर आले आहेत. अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर २ कोटी २० लाख फॉलोवर्स आहेत तर मोदी यांचे फॉलोअर्स हे बच्चन यांच्यापेक्षा एक लाखांहून अधिक आहे. इतकेच नाही तर जगात राजकिय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये मोदींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सर्वाधिक फॉलो केले जाते. ओबामानंतर ट्विटरवर फॉलो केले जाणारे मोदी हे दुसरे राजकिय नेता आहे. जानेवारीमध्ये मोदींनी शहारुख खानला देखील फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले होते. शहारुख आणि अमिताभ यांना भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. शहारुख खान याचे ट्विटरवर १.७३ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स होते पण मोदींनी याबाबत शहारुखलाही मागे टाकले. जानेवारीमध्ये  मोदींचे फॉलोअर्स हे शाहरुखपेक्षा काही हजारांनी जास्त होते. इतकेच नाही तर दोन महिन्यांनी मोदींच्या फॉलोअर्सच्या यादीत लाखांची भर पडते. २००९ पासून मोदी ट्विटरवर अॅक्टीव्ह आहेत. अनेक महत्त्वाची माहिती नरेंद्र मोदी हे आपल्या ट्विटरवरूनच शेअर करत असतात. मोदींनी आपल्या अनेक कँम्पेनचे प्रमोशन करण्यासाठी ट्विटरचा वापर केला  आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm narendra modi becomes most followed indian on twitter

ताज्या बातम्या