लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच वारसा कराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धारेवर धरले. “इंदिरा गांधी यांच्या संपत्तीसाठी राजीव गांधींनी वारसा कर कायदा रद्द केला होता”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“वारसा कराबाबत मी आज तुमच्या समोर एक मोठं तथ्य मांडत आहे. ही वस्तुस्थिती डोळे उघडणारी आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. पण त्यावेळी असा कायदा होता की, मुलांना संपत्ती मिळताना त्यातील काही भाग सरकारकडे जात होता. काँग्रेसने त्याकाळी असा कायदा केला होता. तेव्हा अशी चर्चा होती की, इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींना त्यांची संपत्ती मिळणार होती. पण त्यातील काही संपत्ती सरकारकडे जाऊ नये, म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कायदा रद्द केला आणि संपत्ती वाचवली”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…

हेही वाचा : राजस्थानात फोन टॅपिंगप्रकरणी मोठे गौप्यस्फोट, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतांवर गंभीर आरोप!

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “ही परिस्थिती स्वत:वर आली तर कायद रद्द केला. आता सत्तेच्या लालसेसाठी हे लोक तोच कायदा पुन्हा आणू पाहत आहेत. आपल्या परिवाराची चार-चार पिढ्यांची बिना टॅक्सची संपत्ती मिळवल्यानंतर आता ते सर्वसामान्यांची संपत्ती, तुमच्या मेहनतीची कमाई, जनतेने त्यांच्या मुलांसाठी ठेवलेली संपत्ती, त्यावर टॅक्स लावून आर्धी संपत्ती लुटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.