नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील ६५ तासांत किमान वीस बैठका घेतल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. एकूण तीन दिवस ते अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिकेतून परतताना विमानातही त्यांनी चार प्रदीर्घ बैठका घेतल्या.

याबाबत सविस्तर माहिती देताना सूत्रांनी सांगितले,की मोदी यांनी बुधवारी अमेरिकेला जाताना विमानात दोन बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर तेथे पोहोचल्यानंतर तीन बैठका घेतल्या. २३ सप्टेंबरला त्यांनी अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत पाच बैठका घेतल्या. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर जपान, ऑस्ट्रेलिया यांच्या पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली, यानंतरही त्यांनी तीन अंतर्गत बैठकांचे अध्यक्षपद भूषवले. पुढच्या दिवशी त्यांची अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक झाली, त्यानंतर क्वाड देशांच्या बैठकीला ते उपस्थित होते. २५ सप्टेंबरला चार अंतर्गत बैठकांना ते उपस्थित होते. मोदी हे २५ सप्टेंबरला अमेरिकेहून मायदेशी निघाले तेव्हाही त्यांनी दोन बैठका घेतल्या. परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी हे अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये कार्यरत होते.