पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अहमदाबादहून गांधीनगरला जाणारा ताफा पंतप्रधानांनी रुग्णवाहिकेला वाट देण्यासाठी काही क्षणांसाठी थांबवला होता. या घटनेचा व्हिडीओ भाजपा आमदारासह ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील दोन एसयूव्ही (SUV) गाड्या रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यासाठी रस्त्याच्या कडेला अत्यंत संथगतीने जात असल्याचे या दृश्यांमध्ये दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानाने प्रवास करणाऱ्यांनी एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला तर..; पंतप्रधान मोदींचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दूरदर्शन केंद्राजवळ आयोजित रॅलीनंतर गांधीनगरमधील राजभवनाकडे जात असताना दुपारी ही घटना घडली आहे. पंतप्रधान बनासकांठा जिल्ह्यातील एका प्रचारसभेला आज संबोधित करणार आहेत. प्रसिद्ध अंबाजी मंदिरात मोदींच्या हस्ते आरतीदेखील केली जाणार आहे.

गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्यादिवशी आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. ही एक्स्प्रेस भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. “ही ट्रेन विमानाच्या तुलनेत १०० पट कमी आवाज करते. या ट्रेनचा अनुभव घेतल्यानंतर ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील”, असा दावा या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यात अहमदाबादेत पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. गांधीनगर ते अहमदाबाद प्रवास करत मोदींनी या प्रवासाचा आनंदही लुटला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi convoy stops to give way to ambulance on ahmedabad gandhinagar route rvs
First published on: 30-09-2022 at 17:10 IST