संसदेत मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन मोदी भडकले, संध्याकाळापर्यंत नावं देण्याचा आदेश

खासदारांनी राजकारणासोबत समाजकार्यातही सहभाग घेतला पाहिजे असं मोदींनी यावेळी सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर चांगलेच भडकले असून रोज संध्याकाळी अशा मंत्र्यांची नावं दिली जावीत असा आदेश दिला आहे. दिल्लीत मंगळवारी भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बैठकीत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना संध्याकाळपर्यंत गैरहजर मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यास सांगितलं आहे. बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितलं की, खासदारांनी फक्त राजकारणाशी संबंधित राहता कामा नये. त्यांना राजकरणाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही सहभागी झालं पाहिजे. देशासमोर पाण्याचं मोठं संकट आहे. त्यासाठीही खासदारांनी काम केलं पाहिजे.

“आपल्या परिसरातील अधिकाऱ्यांसोबत बैठक करुन जनतेच्या समस्यांवर चर्चा केली गेली पाहिजे. खासदार आणि मंत्र्यांनी संसेदत उपस्थित असणं गरजेचं आहे”, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. जे मंत्री उपस्थित असणं अपेक्षित असतानाही गैरहजर असतील त्यांची नावं त्याच संध्याकाळी मला दिली जावीत असा आदेश यावेळी नरेंद्र मोदींनी दिला. अधिवेशन सुरु असताना हजर असणं अनिवार्य असल्याचंही यावेळी मोदींनी सांगितलं असल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

नरेंद्र मोदींनी खासदारांना सरकारी कामं आणि योजनांमध्ये तसंच सामाजिक कार्यात स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे असा आग्रह केला. तसंच जेव्हा संसदेचं कामकाज सुरु आहे तेव्हा सभागृहात उपस्थित रहा असंही सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं की, “खासदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना सरकारी योजनांची माहिती दिली पाहिजे. लोकांवर पहिल्यांदा जी छाप पडते, तिच शेवटपर्यंत राहते”. राजकरणातून बाहेर येतही खासदारांनी काम करणं गरजेचं आहे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांनी सुचवलं की, “खासदारांनी आपल्या मतदारसंघात जिल्हा प्रशासनासोबत मिळून काम केलं पाहिजे. राजकारणासोबत सामाजिक कार्यही करा. जनावरांच्या आजारांवरही काम करा. टीबीसारख्या आजारांसाठी मिशन मोडवर काम करा”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi demands for list of absent ministers on parliament duty sgy

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या