पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर असून सोमवारी सकाळी त्यांचं बर्लिनमध्ये आगमन झालं. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सला देखील भेट देणार आहेत एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नसताना दुसरीकडे पंतप्रधानांच्या युरोर दौऱ्याची विशेष चर्चा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बर्लिनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी तिथे राहणाऱ्या भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कारण देखील तसंच ठरलं आहे. मोदींचं आगमन होताच तिथल्या भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी एक आई आपल्या कडेवर आपल्या लहान मुलाला घेऊन सर्वात पुढे उभी होती. यावेळी नरेंद्र मोदी थेट या चिमुकल्याकडे जाऊन त्याच्याशी खेळू लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

मोदींनी आधी चिमुकल्याचा हात हातात घेतला आणि नंतर त्याच्याशी हाताचे खेळ करायला सुरुवात केली. हे पाहून तिथल्या भारतीयांना मोठं अप्रूप वाटत असल्याचं व्हिडीओतील आवाजावरून दिसून येत आहे. शेवटी सगळ्यांना नमस्कार करून मोदी मार्गस्थ झाले.

मोदींचा पाचवा जर्मनी दौरा!

मोदींचा हा पाचवा जर्मनी दौरा आहे. एप्रिल २०१८, जुलै २०१७, मे २०१७ व एप्रिल २०१५ मध्ये मोदींनी जर्मनी दौरे केले होते. डिसेंबर २०२१ मध्ये स्कोल्झ यांनी जर्मन चान्सलरपदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच मोदी त्यांची भेट घेत आहेत. बर्लिनमध्ये दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. परस्पर व्यापारी संबंध दृढ व्हावेत, सांस्कृतिक देवाण-घेवाणीस चालना मिळावी, हा त्यामागील हेतू आहे. जागतिक स्तरांवर होत असलेल्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि व्यूहात्मक संबंधांवर दोन्ही नेते विचारविनिमय करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.