पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी भूमीपूजन पार पडलं. गुजरातमध्ये ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्धाटन होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची गर्दी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर घर बांधणीच्या कामाला वेग आला आहे. सूरतमधील मध्यमवर्गीय, गरीब लोकांनाही सुविधा मिळत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील चार कोटी रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामधील ३२ लाख गुजरात आणि १ लाख २५ हजार सूरतमधील आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले “गुजरात किंवा देशात…”

पुढे ते म्हणाले की “नवरात्र साजरी होत असतानाच पायाभूत सुविधांचं भुमीपूजन, क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करणं हे माझं भाग्य समजतो. सूरत हे एकतेचं उत्तम उदाहरण आहे. देशभरातील लोक सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. ही मिनी-भारत आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी येथे भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचं भुमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून त्याआधीच नरेंद्र मोदींचा हा नियोजित दौरा पार पडत आहे. गुजरातमध्ये गेल्या तीन दशकांपासून भाजपाचीच सत्ता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi inaguartes projects worth 3400 crore in surat says its mini india sgy
First published on: 29-09-2022 at 14:21 IST