प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची ह्रदयविकारानंतर तब्येत खालावली आहे. व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तवला दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी (१० ऑगस्ट) त्यांच्यावर एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीवास्तव कुटुंबाला फोन करून चौकशी केली आहे.

विशेष राजू श्रीवास्तव यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही ते अद्याप बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांना फोन करून प्रकृतीची चौकशी केली. तसेच मदतीचा हातही पुढे केला आहे.

हेही वाचा : खोटय़ा आश्वासन संस्कृतीतून मुक्तता कधी?; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही श्रीवास्तव कुटुंबाला फोन करून चौकशी केली.