निवडणुकीदरम्यान देशातील राजकीय नेते ऐकमेकांवर कितीही राजकीय चिखलफेक करत असले तरी त्यांचे वैयक्तिक संबंध हे राजकारणापलीकडे असतात. संकटाच्या काळात हे राजकीय नेते अनेकदा विरोधीपक्षातील नेत्यांच्या मदतीला धावून जातात, याचा प्रत्यय आपल्याला वेळवेळी येत असतो. असाच एक किस्सा पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे, ज्यावेळी त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन सोनिया गांधी यांची मदत केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच न्यूज १८ नेटवर्कला मुलाखत दिली. यावेळी त्यांना जेपी नड्डा यांच्या काँग्रेस नेत्यांच्या मुलीच्या निधानानंतर त्यांच्या घरी भेट देण्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, जेपी नड्डा यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. ते कर्नाटकात एका कार्यक्रमासाठी गेलेला असताना ही घटना घडली. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्यांनी काँग्रेस नेत्याच्या घरी भेट दिली. खरं तर अशावेळी कोण कोणत्या पक्षाचा आहे. याचा विचार आम्ही करत नाही. असा विचार करण्याची करण्याची आमची मानसिकता नाही.

shehbaz sharif congratulates narendra modi
तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन; म्हणाले…
Narendra Modi News
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, मुख्यमंत्रीपदापासून एकूण किती काळ आहेत सत्तेत?
shambhuraj desai
देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई? राजकीय चर्चांवर उत्तर देत म्हणाले…
nitish kumar meets narendra modi
निकालाच्या एक दिवस आधी नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींची भेट का घेतली?
DMK has complained to the Kanniyakumari district collector Against Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याला डीएमकेचा विरोध, काँग्रेस नेते म्हणतात,”ज्यांच्यात विवेक नाही असे..”
Mamata Banargee on Narendra modi god remark
“मोदींचे मंदिर बांधू आणि ढोकळा अर्पण करू”, ममता बॅनर्जींनी उडवली खिल्ली
PM Narendra Modi Rahul Gandhi
गांधी कुटुंबियांबरोबर संबंध कसे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राहुल गांधींना फोन…’
rahul gandhi
“मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!

हेही वाचा – “मोदी सरकारचं गुजरातप्रेम अन् महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष…”, कांदा निर्यातीवरील बंद…

पुढे बोलताना त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मदतीचा प्रस्ताव दिला होता, तेव्हाची आठवणही सांगितली. ते म्हणाले, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना दमणमध्ये सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यानंतर मी लगेच अहमद पटेल यांना फोन करून एअर ॲम्ब्युलन्स पाठवत असल्याचे सांगितले. मात्र, सर्वकाही ठीक असून दोघेही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

याबरोबरच वाराणसीत जेव्हा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, तेव्हाही अधिकाऱ्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. एकदा निवडणूक प्रचारादरम्यान वाराणसीत सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी मी लगेच अधिकाऱ्यांना पाठवून त्यांची विचारपूस करण्याचे सांगितले होते. तसेच आवश्यक असल्यास त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले होते, असे ते म्हणाले.