scorecardresearch

“राजस्थानचा विकास ही केंद्र सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता”, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चित्तोडगड येथे राजस्थानसाठीच्या वेगवेगळ्या विकासकामांची पायाभरणी केली. तसेच अनेक योजनांचं लोकार्पण केलं.

Narendra Modi
पंतप्रधान मोदी म्हणाले, गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान देशात पहिल्या क्रमांकावर आहे. (PC : Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. चित्तोडगड येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ७,००० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकासकामांची पायाभरणी केली. या वर्षाच्या अखेरीस राजस्थान विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चित्तोडगड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार राजस्थानसाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहे. दरम्यान, चित्तोडगडच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानचा विकास ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केलं आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहून खूप वाईट वाटतं. महिलांविरोधातील गुन्ह्यांची, अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्येच पाहायला मिळत आहेत. तुम्ही यासाठीच काँग्रेसला मतदान केलं होतं का?

godhan nyay yojana
गोधन न्याय योजना: छत्तीसगड सरकारनं ६५ हजार विक्रेत्यांकडून केली कोट्यवधींची शेणखरेदी, ५.१६ कोटी रूपये विक्रेत्यांच्या खात्यात!
eknath shinde
‘झोपु’ योजनेतील सर्व इमारतींचे लवकरच अग्निप्रतिबंधक सर्वेक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा
PM-Narendra-Modi-and-Rahul-Gandhi-Speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी; ओबीसींचा खरा कैवारी कोण?
eknath-shinde-aditi-tatkare
आदिती तटकरेंच्या मतदारसंघात निधीचा ओघ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केंद्र सरकार राजस्थानच्या विकासाला प्राधान्य देत आहे. आम्ही राजस्थानमध्ये एक्सप्रेस हायवे आणि रेल्वेसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे असो, अथवा अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवे असेल, हे मार्ग राज्थानमधील लॉजिस्टिकशी संबंधित सेक्टरला नवीन शक्ती देतील. काही दिवसांपूर्वी उदयपूर-जयपूर वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे.

हे ही वाचा >> बुलढाण्यात भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, चार जण जागीच ठार

नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थान हे भारतमाला प्रकल्पांतर्गत सर्वाधिक व्यापार करणारं राज्य आहे. राजस्थानचा इतिहास आपल्याला वीरता आणि वैभव एकत्र घेऊन पुढे कसं जायचं ते शिकवतो. आपण त्याप्रमाणे चाललं पाहिजे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi says rajasthan development biggest priority for union government asc

First published on: 02-10-2023 at 14:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×