scorecardresearch

Premium

“काही अर्बन नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात, घोषणांपासून धोरणांपर्यंत…”, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

भाजपा कार्यकर्ता महाकुंभ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Narendra Modi (9)
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळात मध्य प्रदेश हे राज्य आजारी होतं. (PC : Naredra Modi Twitter)

भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये कार्यकर्ता महाकूंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले, मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हे बिमारू (आजारी) राज्य होतं. घाणेरडं राजकारण, कुशासन आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार ही काँग्रेस सरकारची ओळख होती. परंतु, आता मध्य प्रदेशने झेप घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पोकळ झाली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्य प्रदेशात दीर्घ काळ काँग्रेसचीच सत्ता होती. परंतु या काळात काँग्रेसने नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवलं. काँग्रेसच्या काळात मध्य प्रदेशात घोटाळ्यांचे विक्रम झाले, घोटाळ्यांचे इतिहास रचले गेले. व्होट बँक, तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या या पक्षाला पुन्हा मध्य प्रदेशात संधी मिळाली तर राज्याचं आणखी नुकसान होईल. काँग्रेस पुन्हा एकदा मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्य बनवेल.

PM-Narendra-Modi-and-Rahul-Gandhi-Speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी; ओबीसींचा खरा कैवारी कोण?
jayant patil vs samrat mahadik
शिराळ्याचे राजकारण कोणत्या दिशेने?
nitish kumar
जदयू पक्ष पुन्हा एनडीएत सहभागी होणार? खुद्द नितीश कुमार यांनी दिलं उत्तर; म्हणाले…
sunil tatkare
बारामतीमधून कोण निवडणूक लढविणार? सुनील तटकरे म्हणाले, ‘हा निर्णय…’

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने त्यांची इच्छाशक्ती गमावली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेसचे तळागाळातले नेते शांत बसले आहेत. काँग्रेसचे तळागाळात पोहोचलेले नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. काँग्रेस आधी उद्ध्वस्त झाली, त्यानंतर कंगाल झाली आहे. आता काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे. काँग्रेस हा पक्ष आता काँग्रेसचे नेते चालवत नाहीत. काँग्रेस ही एक अशी कंपनी झाली आहे, ज्यांच्या घोषणांपासून धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी आयात केल्या जात आहेत.

हे ही वाचा >> “पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस त्यांच्या घोषणा आणि धोरणं कोणाकडून आयात करते? काँग्रेसचा ठेका कोणाकडे आहे माहितीय का? काँग्रेसचा ठेका आता काही अर्बन नक्षलवाद्यांकडे आहे. काँग्रेसमध्ये आता अर्बन नक्षलवाद्यांचं चालतं. काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना आता जाणवू लागलं आहे की त्यांचा पक्ष जमिनीवर पोकळ झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi says urban naxalites run congress party asc

First published on: 25-09-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×