पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून लोकप्रिय घोषणा करून तात्पुरता राजकीय लाभ मिळवण्याचा मोह टाळला असला तरी, पगारदार-मध्यमवर्ग करदाते, गरीब-श्रमिक, शेतकरी-छोटे उद्योजक आदी विविध समाजघटक ‘अर्थलाभा’पासून वंचित राहिले. सलग दुसऱ्या वर्षीही भांडवली खर्चात वाढ करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला असला तरी, या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या निराशेत आणखी भर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं असून आज ते या अर्थसंकल्पासंदर्भात भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकर्त्यांना अर्थसंकल्पामधील बारकावे समजावून सांगणार असल्याचं बोललं जातंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साकळी ११ वाजता अर्थसंकल्पासंदर्भात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. डिजीटल माध्यमातून मोदी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या भाषणामध्ये पंतप्रधान अर्थसंकल्पाबद्दल आपले विचार मांडणार आहेत. याचसंदर्भातील तयारी सकाळपासून सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचं एएनआयच्या वृत्तात म्हटलंय.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

नक्की वाचा >> खासदाराने संसदेमध्येच पंतप्रधानांकडे राज्यपालांबद्दल केली तक्रार; मोदी म्हणाले, “तुम्ही कधी…”

देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये एलईडी स्क्रीन्स बसवण्यात आल्या असून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचं भाषण पोहचवण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलंय. केंद्र सरकार देशामधील सर्व स्तरातील लोकांसाठी काम करत असून हाच मुद्दा अर्थसंकल्पामधून अखोरेखित करण्यात आल्याचं पंतप्रधान आपल्या भाषणादरम्यान सांगणार असल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Budget 2022: असे असणार Income Tax Slabs; पाहा कोणाला किती कर भरावा लागणार

करोनामुळे मध्यमवर्गाचे उत्पन्न कमी झाले असून महागाई वाढू लागली आहे. चलनवाढीपासून सावध राहण्याचा इशारा आर्थिक पाहणी अहवालातून देण्यात आला असताना गृहकर्जात तसेच, प्राप्तिकरात सवलत देऊन मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची आशाही अर्थसंकल्पाने पूर्ण केली नाही. मात्र असं असलं तरी पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलंय.

“लोकाभिमुख, पुरोगामी’ आणि पायाभूत सोयी, गुंतवणूक, वाढ व नोकऱ्या यांच्या अमर्याद संधी असलेला असा यंदाचा अर्थसंकल्प आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “गरिबांचे कल्याण’ हा या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू आहे. समकालीन समस्या सोडवण्यासह सामान्य नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करणे यातून साध्य होणार आहे. प्रत्येक गरीब कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय, नळाचे पाणी व गॅसजोडणी सुनिश्चित करण्याचे अर्थसंकल्पाचे ध्येय आहे. त्याचवेळी इंटरनेटच्या सहजवापरावरही यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे,” असंही म्हटलंय.

लोकसत्ता विश्लेषण: Battery Swapping Policy म्हणजे काय?; यामुळे भारतात इलेक्ट्रिक गाड्या कशा स्वस्त होणार?

निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अगदी थोडक्यात यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. आपल्या छोट्याश्या भाषणात मोदींनी अर्थसंकल्प हा जनतेसाठी फायद्याचा ठरणार असल्याचं अधोरेखित केलं. मात्र त्यांनी यावर सविस्तर भाष्य करणं टाळलं. आपण उद्या म्हणजेच बुधवारी यासंदर्भात सविस्तर बोलू असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे पंतप्रधान आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.