पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एक, दोन पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांची खास मालिका जारी केली आहे. ही नाणी सामान्य नाण्यांपेक्षा विशेष असतील असणार आहेत. कारण ही नाणी किती रुपयांची आहेत हे अंध व्यक्तींनादेखील ओळखता येणार आहेत. दिल्ली येथील अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे यायोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी यांनी वरील खास नाणी सार्वजनिक केली.

हेही वाचा >> Sidhu Moosewala Murder: मुसेवाला प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन; पुण्यातून दोन शार्प शुटर्सला अटक

या नाण्यांची काय विशेषता आहे?

मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या या विशेष नाण्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या नाण्यांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’चा (AKAM) लोगो असेल. तसेच ही नाणी अंध व्यक्तींना लगेच ओळखता येतील. कोणता शिक्का किती रुपयांचा आहे हे अंध वय्क्तींना सहज समजू शकले.

हेही वाचा >> संजय राऊत, एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल; प्रभू रामाचं दर्शन घेऊन माध्यमांशी साधला संवाद, म्हणाले…

नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक विक या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत सरकारने युवकांच्या प्रगतीसाठी काय काय केले याबद्दल माहिती दिली. “मागील आठ वर्षांमध्ये भारत सरकारने अनेक सुधारणा केल्या. यामध्ये युवकांना त्यांचे सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळावी या दृष्टीने काम केले गेले. आपल्या युवकांना त्यांना वाटेल ती कंपनी सुरु करता यावी, यासाठी प्रयत्न केले गेले,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.