अमेरिका दौऱ्याहून परताताच पंतप्रधान मोदींनी कामास सुरुवात केली आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास राजधानी दिल्लीत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली. मोदींनी वीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे एक तास घालवला आणि वैयक्तिकरित्या इमारतीच्या बांधकाम स्थितीची पाहणी केली. पंतप्रधान मोदी रात्री अचानक नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधकाम स्थळाच्या पाहणीची काही फोटोही समोर आले आहेत. पंतप्रधान मोदी स्वत: पांढऱ्या रंगाचे सुरक्षा हेल्मेट घालून साइटची पाहणी करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी रविवारी अचानक येथे भेट दिली होती. त्यांच्या या भेटीबद्दल कोणालाही माहिती नव्हती. पंतप्रधान मोदी सुमारे एक तास बांधकाम साइटवर थांबून पाहणी करत होते.

नवीन संसदेची इमारत सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधली जात आहे. प्रकल्पाअंतर्गत नवीन इमारतींच्या बांधकामासाठी मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत. संसदेच्या नवीन इमारतीसाठी सुमारे १००० कोटी रुपये खर्च केले जातील. ६४५०० चौ.मी.च्या क्षेत्रात नवीन इमारत बांधली जात आहे आणि ती जुन्या इमारतीपेक्षा १७ हजार चौरस मीटर मोठी असेल. नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदींनी जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करत आहोत. देशातील कार्यालये निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम, आम्ही देशातील शहिदांना आदर देण्याचे काम केले असे म्हटले होते.

अमेरिकेत पंतप्रधानांच्या ६५ तासांत २० बैठका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील ६५ तासांत किमान वीस बैठका घेतल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. एकूण तीन दिवस ते अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिकेतून परतताना विमानातही त्यांनी चार प्रदीर्घ बैठका घेतल्या.