अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडलं असून दोनच दिवसांत, म्हणजे ८ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याच राज्यात निवडणुका असल्यामुळे भाजपानं गुजरातमधली सत्ता राखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. दुसरीकडे काँग्रेसनं भाजपाच्या हातातून सच्चा पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे. आता सगळ्यांचं लक्ष निकालांकडे लागलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदान करतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेते प्रकाश राज यांनी खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी स्वत: रांगेत!

दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मतदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ५ डिसेंबर रोजी गांधीनगर मतदारसंघात मतदान केलं. यावेळी मोदी स्वत: मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहनदेखील केलं. यासंदर्भात मोदींनी ट्वीटही केलं होतं. “मोठ्या संख्येनं सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मी करतो. मी स्वत: सकाळी ९ वाजता अहमदाबादच्या गांधीनगर मतदारसंघात मतदान करणार आहे”, असं ट्वीट मोदींनी सकाळी केलं होतं.

दुसऱ्या टप्प्यात गुजरातमधील एकूण ९३ जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये एकूण ८०० उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालं आहे. पहिल्या टप्प्यात अशाच प्रकारे ८९ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपाला पुन्हा गुजरातमध्ये सत्ता मिळणार असल्याचे संकेत समोर आले आहेत.

‘त्या’ फोटोवरून प्रकाश राज यांचा टोला!

दरम्यान, मतदान करतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. गांधीनगर मतदारसंघातील आपल्या मतदान केंद्रावर मोदी मतदान करतानाचा हा फोटो आहे. यावेळी मोदी मतदान करताना समोर फोटोग्राफरकडे बघत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. यावरून प्रकाश राज यांनी दोन शब्दांचं ट्वीट करत टोला लगावला आहे.

‘आधी फोटो’ असं म्हणत प्रकाश राज यांनी मोदींच्या या फोटोवरून खोचक टिप्पणी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi voting photo viral gujarat election 2022 prakash raj tweet pmw
First published on: 06-12-2022 at 11:13 IST