राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतल्या त्रुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. काही विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान लवकरच राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यांना त्यांच्या पंजाब दौऱ्यातील कथित सुरक्षा त्रुटींबद्दल माहिती देतील.

आज सकाळी, पंजाब सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्याच्या भेटीदरम्यान झालेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. या समितीमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) मेहताब सिंग गिल, प्रधान सचिव (गृह व्यवहार) आणि न्यायमूर्ती अनुराग वर्मा यांचा समावेश असेल आणि ते ३ दिवसांत अहवाल सादर करतील, असे पंजाब सरकारने सांगितले.

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
prakash mahajan on Raj thackeray
मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देतायत? प्रकाश महाजन म्हणाले, “राज ठाकरेंमुळे आमची…”
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”

बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला होता, त्यानंतर ते एका रॅलीसह कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित न राहता पंजाबमधून परतले. यावेळी सुरक्षेची गंभीर त्रुटी राहिल्याचं निदर्शनास आलं. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला तातडीने अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा प्रक्रियेची अशी उदासीनता पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि जबाबदारी निश्चित केली जाईल.”तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता, पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागेल, जी स्पष्टपणे तैनात केली गेली नव्हती. या सुरक्षा त्रुटींनंतर, भटिंडा विमानतळाकडे परत जाण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे त्यात जोडले गेले. त्यात म्हटले आहे की केवळ पंजाब पोलिसांना पंतप्रधानांचा नेमका मार्ग माहित होता. पोलिसांचे असेच वर्तन कधीच पाहण्यात आलेलं नाही.”

पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसने पंतप्रधानांना शारीरिक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाने केल्याने या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण झाला, तर इतर पक्षांनीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्ला केला.