पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून तमिळ, तर जगातील सर्वात बोलल्या जाणाऱ्या भाषेंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदीचाही गौरव केलाय. यावेळी त्यांनी मातृभाषा आईप्रमाणे आपलं जीवन घडवते असं मत व्यक्त केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. यातील तज्ज्ञ लोक मातृभाषा शब्द कोठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत अधिक माहिती देऊ शकतात. जशी आपली आई आपलं आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपलं जीवन घडवते. भारतात जगातील सर्वात जुनी भाषा असलेली तमिळ भाषा आहे. २०१९ मध्ये हिंदी जगातील सर्वाधित बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.”

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”
punjab cm bhagwant maan may arrest
अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

“सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“आजच्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे. ‘सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा'”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी देखील काही लोक मानसिक द्वंदात आहेत. त्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोशाख, आपली खाद्यसंस्कृती याबाबत संकोच वाटतो. खरंतर जगात असं कोठेही दिसत नाही,” असंही मोदींनी नमूद केलं.

“काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाचं एक जन आंदोलन सुरू”

नरेंद्र मोदी म्हणाले, “पुन्हा एकदा लोकांनी मिळून काही तरी अद्भुत काम करण्याचं ठरवलं आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाचं एक जन आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत श्रीनगरचे तलावांची साफ-सफाई आणि त्यांचं जुनं वैभव पुन्हा आणण्याचे अनोखे प्रयत्न होत आहेत.

हेही वाचा : Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींकडून पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटच्या कार्याची प्रशंसा, म्हणाले…

“मुंबईच्या सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मोदींकडून कौतुक”

“आसाममधील कोकराझार येथे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एक गटाने ‘स्वच्छ आणि हिरवं कोकराझार’ मिशन सुरू करत प्रशंसनीय काम केलंय. विशाखापट्नममध्ये पॉलिथीन ऐवजी कापडी पिशवीच्या वापराला प्रोत्साहन दिलं जातंय. मुंबईच्या सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या अभियानात सौंदर्याचाही समावेश केला आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.