काहीही झाले तरी देश हिताशिवाय दुसऱ्या कोणाच्या हिताचा विचार करणार नाही. पुलावामाचे संकट असो, उरीची घटना असो किंवा माझ्या आयुष्यातील दुसरी कुठली घटना. माझ्या जीवनाचा एकच मंत्र आहे राष्ट्र प्रथम आणि तोच मंत्र घेऊन मी जीवन जगत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये म्हणाले. काशीने मला फक्त खासदारच बनवले नाही तर पंतप्रधानपदाचा आशीर्वाद दिला असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींचा आज वाराणसीमध्ये भव्य रोड शो झाला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज भव्य  रोड शो संपन्न झाला. दशाश्वमेध घाटावर ते गंगा आरतीमध्ये सहभागी झाले होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींसोबत होते.

बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या (बीएचयू) गेटवर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून रोड शोला सुरुवात केली. हा रोड शो जवळपास सात किमीपर्यंत चालला. लंका परिसरातून या रोड शो ला सुरुवात झाली.  उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

क्रवारी सकाळी 9.30 वाजता मोदी बूथ प्रमुक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी संबोधित करतील. सकाळी 11 वाजता मंदिरात जाऊन पूजा करतील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.