राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येकाने प्रभू राम यांच्याप्रमाणे उच्च नितीमूल्यांचा कायम अंगिकार केला पाहिजे, असे यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे. प्रभू रामचंद्रांनी आखून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करून विचार, शब्द आणि कृती या तिन्ही मार्गाने आदर्श जीवन जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांनी सकाळी ट्विट करून रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. रामनवमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आहे. अयोध्येसह विविध ठिकाणी राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रामनवमीनिमित्त भजन-कीर्तनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.