द्वितीय महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडने जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या नुकसान भरपाईमुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, असे पोलंडकडून सांगण्यात आले आहे. वॉरसॉ येथे होणाऱ्या दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीपूर्वी पोलंडकडून ही मागणी करण्यात आली. तर जर्मनीने यापूर्वीच पूर्णपणे नुकसान भरपाई दिल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”

“नुकसान भरपाई संदर्भातील कागदपत्रे आम्ही जर्मनीला दिली असून यात महायुद्धाच्या वेळी जर्मन सैन्यांनी पोलंडमधून नेलेल्या ऐतिहासिक कलाकृती आणि बॅंकेतील पैशांचा समावेश आहे”, अशी प्रतिक्रिया पोलंडचे परराष्ट्रमंत्री झिबीग्न्यू राऊ यांनी दिली आहे. तसेच “जर्मन सरकारने त्यांच्या नागरिकांना पोलंडवर झालेल्या हल्ल्याचे परिणाम आणि खरी परिस्थिती याबद्दल माहिती देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असेही ते म्हणाले.

पोलंडमधील विद्यमान सरकारने महायुद्धातील नुकसानीसंदर्भातील एक अहवाल काही दिवसांपूर्वी सादर केला होता. या अहवालानुसार जर्मनीच्या हल्ल्यात पोलंडचे १.३ ट्रिलिनचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच १९५३ मध्ये पोलंडमधील तत्कालीन कम्युनिस्ट नेत्यांनी जर्मनीबरोबर केलेला करार नाकारत जर्मनीकडून ही नुकसान भरपाई घेण्यात यावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा – VIDEO: विमानात गुलाब जामून नेण्यास कर्मचाऱ्यांची मनाई, मग प्रवाश्याने जे केलं ते…

दरम्यान, पोलंडच्या या मागणीनंतर जर्मनीच्या परराष्ट्रीय खात्याकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जर्मनीने युद्धानंतरच्या काही वर्षांत पूर्वेकडील देशांना युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई दिली असल्याचा दावा केला आहे. “आम्ही युद्धाच्या काही वर्षांनंतर पूर्वेकडील देशांना नुकसान भरपाई दिली होती. मात्र, त्यानंतर पोलंडची सीमा निर्धारीत झाली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही”, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीच्या नाझी सैन्यांनी पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाली होती. या युद्धात जवळपास ६ मिलियन पोलंड नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात ३ मिलियन यहूदी नागरिकांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poland demands compensation of world war two damages by germany attack spb
First published on: 04-10-2022 at 23:24 IST