उत्तर प्रदेशात १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पीडित मुलीच्या वडिलांसहित समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. अकरावीत शिकणाऱ्या या पीडित विद्यार्थिनीने आपल्यावर एकूण २८ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये वडील, राजकीय नेत्यासोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. “आम्ही आतापर्यंत सात लोकांना अटक केली असून यामध्ये मुलीचे वडील आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आपला पती १० वर्षाच्या मुलावरही लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाला सुरक्षा दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आईसोबत १२ ऑक्टोबरला ललितपूर पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचा आरोप केला. जेव्हा आपण सहावीत होतो तेव्हा वडिलांनी जबरदस्ती पॉर्न व्हिडीओ दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं.

यानंतर आरोपी पित्याने मुलीला शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेलं, जिथं तिच्यावर लोकांनी बलात्कार केला. वडिलांनी धमकावलं असल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती. यानंतर तिने आपल्या आईला सांगितलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपात २५ जणांचं नाव असून तीन अज्ञात आहेत.

ललितपूरचे पोलीस अधीक्षक निखील पाठक यांनी मुलीला ज्या हॉटेल्समध्ये नेण्यात आलं होतं तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest seven people including victims father sp bsp leaders after teen alleges rape by 28 people in up sgy
First published on: 16-10-2021 at 09:00 IST