खंडणीसाठी अपहरण केलेल्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाची रविवारी बिहारच्या मुंगेर जिल्ह्य़ातील खरगपूरमधून सुटका करण्यात आली.
मुंगेर पोलीस आणि विशेष कृती दला(एसटीएफ)च्या संयुक्त कारवाईत बेजलपूरच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक सुबोध सहा यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त वरुण कुमार सिन्हा यांनी दिली. खंडणीसाठी ५० वर्षांच्या सहा यांचे सरकारी निवासस्थानावरून शनिवारी अपहरण केले गेले होते. राजन बिंड टोळीच्या सात सदस्यांनी २४ तास त्यांना लाडिया आणि खरागपूर गावाच्या दरम्यान अपहरण करून ओलीस ठेवले होते. पोलिसांनी शिक्षकांच्या अपहरणात प्रावीण्य असलेल्या टोळीच्या सदस्यांमधील मोबाईल संभाषणावर पाळत ठेवताना अपहरणकर्त्यांचा शोध लावल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.