एक्सप्रेस वृत्त, हैदराबाद : येथील शादनगरमधील चत्तनपल्ली येथे एका पशुवैद्यक महिलेवर  २७ नोव्हेंबर २०१९ रोजी बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा आरोपींच्या पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. या चकमकीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व्ही. एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता. या आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे, की या आरोपींना ठार मारण्याच्या हेतूनेच पोलिसांनी हेतुपुरस्सर गोळीबार केला. या प्रकरणी दहा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस आयोगाने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयास दिलेल्या अहवालात तीन सदस्यीय आयोगाने नमूद केले आहे, की ६ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे जे दहा पोलीस अधिकारी आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्या दहा जणांवरही कारवाई व्हावी. मोहम्मद आरीफ, चिंतकुंटा चेन्नाकेशवलु व जोल्लू शिवा आणि जोल्लू नवीन या चुलत भावांनी सोबत असलेल्या पोलिसांवर हल्ला करून त्यांची शस्त्र हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, या चकमकीच्या कथित कारणावर आयोगाचा विश्वास नाही. यापैकी चेन्नाकेशवलु व शिवा हे घटना घडली त्यावेळी त्यांच्या शालेय नोंदीनुसार अल्पवयीन होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police firing intent kill four investigation report encounter accused hyderabad rape case ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST