पीटीआय, चंडीगड : कट्टर धर्मप्रचारक अमृतपाल सिंग याच्याविरुद्धच्या पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३६० पैकी ३४८ जणांची सुटका करण्यात आली असल्याचे पंजाब सरकारने अकाल तख्तला कळवले आहे. उर्वरित लोकांचीही लवकरच सुटका केली जाईल्0ा असा निरोप सरकारकडून मिळाला असल्याचे अकाल तख्तच्या जत्थेदारांचे स्वीय सचिव जसपाल सिंग यांनी गुरुवारी सांगितले. अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलीस कारवाईदरम्यान पकडणअयात आलेल्या सर्व शीख युवकांची सुटका करावी, असा निर्वाणीचा इशारा अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्य सरकारला दिला होता. या कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के लोक अट्टल गुन्हेगार आहेत, असे जत्थेदारांनी हा इशारा देणअयाच्या काही दिवस आधी पंजाब पोलिसांनी म्हटले होते. इतरांची पडताळणीनंतर सुटका केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते.