अमृतपालविरुद्धच्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या ३४८ जणांची पोलिसांकडून सुटका

या कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला होता.

amritpal singh
वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (संग्रहीत छायाचित्र)

पीटीआय, चंडीगड : कट्टर धर्मप्रचारक अमृतपाल सिंग याच्याविरुद्धच्या पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३६० पैकी ३४८ जणांची सुटका करण्यात आली असल्याचे पंजाब सरकारने अकाल तख्तला कळवले आहे. उर्वरित लोकांचीही लवकरच सुटका केली जाईल्0ा असा निरोप सरकारकडून मिळाला असल्याचे अकाल तख्तच्या जत्थेदारांचे स्वीय सचिव जसपाल सिंग यांनी गुरुवारी सांगितले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

 अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलीस कारवाईदरम्यान पकडणअयात आलेल्या सर्व शीख युवकांची सुटका करावी, असा निर्वाणीचा इशारा अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्य सरकारला दिला होता. या कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के लोक अट्टल गुन्हेगार आहेत, असे जत्थेदारांनी हा इशारा देणअयाच्या काही दिवस आधी पंजाब पोलिसांनी म्हटले होते. इतरांची पडताळणीनंतर सुटका केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST
Next Story
रशियात अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक
Exit mobile version