Crime News : एका १८ वर्षीय तरुणीची हत्या प्रकरणात आरोपीने न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. आपल्या धक्कादायक गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने सांगितलं की, त्याने बसमध्ये भेटलेल्या तरुणीची हत्या करायची की नाही याचा निर्णय आपण नाणेफेक करून घेतल्याची माहिती दिली आहे. पोलंडमधील ग्लिविस (Gliwice० येथे २ वर्षीय मॅट्युझ हेपा (Mateusz Hepa) याच्याविरोधात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान हा धक्कादायक प्रकरा उजेडात आला आहे. त्याच्यावर ऑगस्ट २०२३ मध्ये विक्टोरिया कोझील्सका (Wiktoria Kozielska) च्या हत्येचा आरोप आहे.

मीडिया रिपोर्टनुसार कोझील्सका ही तरुणी रात्री एक पार्टी आटोपून परतत होती तेव्हा तिची भेट हेपाशी झाली. हेपा आहा कार दुरूस्तीच्या दुकानातील आपलं काम संपवून निघाला होता. दोघे बसमध्ये भेटले आणि आरोपी तरुणीला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला, जेथे ती झोपी गेली. हेपाने न्यायालयात सांगितलं की, तिची हत्या करावी की नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्याने चक्क टॉस केला.

bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
juvenile assault with knife in Mumbai news in marathi
जाड्या चिडवल्याने मित्रावर चाकूने हल्ला; दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!

आरोपीचा धक्कादायक खुलासा…

“मी नाणं टॉस केलं, आणि त्यावर छापा आला, म्हणून मग मी तिची हत्या केली. जर काटा आला असता तर ती कदाचित जिवंत असती”, असं हेपाने न्यायालयात सांगितलं. तो आपला गुन्हा कबूल करताना म्हणाला की, त्यानं तरुणीचा दोरीने गळा आवळला. तिने स्वत:चा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. तिची हत्या केल्यावर तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचेही आरोपीने मान्य केले.

हेपाने दावा केला की, तो बऱ्याच दिवसांपासून हत्येचा विचार करत होता आणि यापूर्वी अशा एखाद्या बळीचा शोध घेण्यासाठी तो शहरात फिरला होता. हत्येच्या रात्री त्याने कोझील्सका तिच्या घरी किंवा त्याच्या फ्लॅटवर जाण्याचा पर्याय दिले होके, तिने त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला. आरोपीने सांगितलं की, आम्ही गप्प बसून राहिलो, त्यानंतर ती झोपी गेली. मी खोलीत फेऱ्या मारत राहिलो, तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी ते करू शकलो नाही. त्यानंतर मी टॉस केला.

हेही वाचा>> लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीप…

हेपाने सांगितलं की त्याने पीडितेचा गळा दाबून खून केला, कारण यामुळे रक्ताचा येणार नव्हतं. तसेच त्यानं कबूल केलं की त्याने नंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून दडवण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह जाळण्याचाही त्याचा विचार होता.

हेपाने अटक झाली तेव्हा पोलिसांना सांगितलं होतं की, “मला हत्या करणं गरजेचं वाटत होतं”. आपल्याला हत्या केल्यानं चांगलं वाटेल असं वाटल्याचेही तो म्हणाला होता. आरोपीने नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार सोडून दिला आणि पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा खटल्याची सुनावणी ८ जानेवारी रोजी सुरू झाली ज्याला पीडित तरुणीचे पालक आणि मित्र न्यायालयात हजर होते. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.

Story img Loader