scorecardresearch

शिवपाल यादव भाजपामध्ये जाण्याच्या अटकळींचे पेव

नाराज असलेले समाजवादी नेते शिवपाल सिंह यादव यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यामुळे, ते समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सोडून भाजपामध्ये सामील होतील अशा अटकळींना ऊत आला आहे.

पीटीआय, लखनऊ : नाराज असलेले समाजवादी नेते शिवपाल सिंह यादव यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यामुळे, ते समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सोडून भाजपामध्ये सामील होतील अशा अटकळींना ऊत आला आहे.

 प्रगतिशील समाजवादी पक्ष (लोहिया) चे प्रमुख असलेले शिवपाल यांचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असलेले त्यांचे पुतणे अखिलेश यादव यांच्यासोबतचे संबंध तणावाचे झाले असल्याच्या बातम्या आल्यामुळे या अटकळींना बळकटी मिळाली आहे. शिवपाल हे बुधवारी आदित्यनाथ यांना भेटले होते. तथापि, विरोधी आघाडीतील एक महत्त्वाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी हा मुद्दा दखलपात्र नसल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबात काही अंतर्गत बाबी आहेत आणि ते सर्वजण एकत्र राहतील हे निश्चित करण्यासाठी शिवपाल प्रयत्न करत आहेत, असे राजभर म्हणाले.

पक्षाच्या कार्यकत्र्यंनी गुरुवारी बदलत्या राजकीय परिस्थतीबाबत आपल्या नेत्यांशी चर्चा केली आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे शिवपाल यांना सांगितले, अशी माहिती दीपक मिश्रा यांनी पीटीआयला दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Politics election wave speculation shivpal yadav will join bjp ysh