गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी विभागातील भिंबर गली ते पुंछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला होता. तसेच त्यांनी लष्काराच्या वाहनांवर ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले. दरम्यान, ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी राजौरीतील सैंगोट गावात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्याचेच सामान या ट्रकमधून जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता सैंगोट गावातील गावकऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – “तिरस्काराचं राजकारण करून काही लोक देशाचं विभाजन…” ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
thane shivai nagar samaj bhavan marathi news
शिवाईनगर येथील समाजभवनावरून शिवसेना -भाजपत जुंपली
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने सैंगोट गावात २० एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीसाठी चार हजार नागरिकांना आमंत्रण देण्यात आले. संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम सुरू होणार होता. त्यासाठी फळं इतर इफ्तार पार्टीसाठी लागणारे इतर साहित्य घेऊन राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांची एक तुकडी दुपारी तीन वाजता आरआर मुख्यालयातून निघाली. मात्र हा ट्रक भिंबर गली ते पुंछ मार्गावर पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.

हेही वाचा – “पुलवामा हल्ला मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे”; सत्यपाल मलिकांच्या आरोपांवर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सोडलं मौन, अमित शाह म्हणाले…

याबाबत बोलताना सैंगोट गावाचे सरपंच मुखतियाज खान म्हणाले, या हल्ल्याचे वृत्त मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आमचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले आहे. आम्ही या जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. या दु:खद घटनेनंतर गावकऱ्यांनी ईद (Eid) साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – “भारताबरोबर युद्धाची शक्यता असल्याने पंजाबमधील निवडणूक पुढे ढकलावी”; पाकिस्तान सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

दरम्यान, या हल्ल्यात राष्ट्रीय राइफल्सचे हवालदार मनदीप सिंह, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह हे जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी असून, लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तसेच संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू असून ड्रोनचा वापरदेखील केला जात आहे.