ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी नवनियुक्त सल्लागार समितीच्या खातेवाटपाची घोषणा केली. संरक्षणासह २७ मंत्रालयांचा कार्यभार युनूस यांच्याकडेच आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रमुखपदी राजनैतिक अधिकारी मोहम्मद तौहीद हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Brazil Plane Crash VIDEO : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, विमान जळून खाक

sheikh hasina latest news in india
Bangladesh Political Crisis: “जर भारताऐवजी दुसरा कुठला देश असता तर…”, शेख हसीनांना आश्रय दिल्यावरून BNP पक्षाची नाराजी; म्हणाले, “संताप स्वाभाविकच”!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
war of words between jaya bachchan and jagdeep dhankhar over language tone
राज्यसभेत ‘मानापमान नाट्या’चा प्रयोग!
Pm Modi on Creamy Layer
Creamy Layer Criteria : अनुसूचित जाती-जमातींसाठी क्रिमीलेयर लागू करणार? मोदींची भूमिका काय? खासदारांच्या भेटीत पंतप्रधान म्हणाले…
congress s nyay yatra will cover 36 constituency of mumbai
मुंबईच्या ३६ मतदारसंघात काँग्रेसची ‘न्याय यात्रा’
Chandrakant patil contest assembly polls from Kothrud Assembly constituency
कारण राजकारण : चंद्रकांतदादांसाठी यंदा कोथरुड कठीण?
hindenburg research post on india
Hindenburg Research : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!
Vinesh Phogat Disqualification Appeal Updates Paris Olympics 2024 in Marathi
Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानांच्या समतुल्य हे पद आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणेनुसार युनूस यांनी खातेवाटप जाहीर केले. युनूस यांच्याकडे संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, शिक्षण, ऊर्जा, अन्न, जलसंपदा आणि माहिती मंत्रालयांसह २७ खात्यांची जबाबदारी आहे. लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम. सखावत हुसेन यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सलाहुद्दीन अहमद हे वित्त आणि नियोजन मंत्रालयाचे प्रभारी असतील.

भारतबांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी समितीनवी

दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) उच्च अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. बांगलादेशात सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमल्याचे शहा यांनी सांगितले. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही समिती बांगलादेशातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. बांगलादेशातील भारतीय नागरिक, हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेसाठी ही समिती चर्चा करणार आहे, असे शहा यांनी सांगितले.