scorecardresearch

दलाई लामा उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीत चिनी हस्तक्षेप शक्य! तिबेटच्या निर्वासित सरकारला भीती

दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीन हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन तिबेटच्या निर्वासित सरकारने या आध्यात्मिक नेत्याच्या खांदेपालटासंदर्भात लोकशाही पद्धतीने योजना आखली आहे.

दलाई लामा उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीत चिनी हस्तक्षेप शक्य! तिबेटच्या निर्वासित सरकारला भीती
दलाई लामा

कोलकाता : दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीन हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन तिबेटच्या निर्वासित सरकारने या आध्यात्मिक नेत्याच्या खांदेपालटासंदर्भात लोकशाही पद्धतीने योजना आखली आहे. ही माहिती तिबेट सरकारचे अध्यक्ष व सिकयोंग पेन्पा त्सेिरग यांनीच दिली.

त्सेरिंग यांनी या वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत अधोरेखित केले, की चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाने १९९५ मध्ये प्रतिस्पर्धी पंचेन लामा यांच्या नियुक्तीप्रमाणे नियुक्तीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यावेळी दलाई लामांनी निवडलेल्या मुलाला गायब केले गेले होते. त्या वेळची पुनरावृत्ती होऊ शकते. चीन-तिबेट समस्येचे निराकरण झाले नाही तर सध्याच्या दलाई लामांनंतरच्या भवितव्याचे तिबेटवासीयांसमोर आव्हान आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीत चीन नक्कीच हस्तक्षेप करेल. ते यासाठी गेल्या १५ वर्षांपासून तयारी करत आहेत.

‘भारत-तिबेट सीमेवर चीनकडून घुसखोरी’
कोलकाता : भारत-तिबेट सीमेवरील सर्व घुसखोरी चीनने एकतर्फी केली असल्याचा दावा तिबेटमधील निर्वासित सरकारचे अध्यक्ष पेन्पा त्सेरिंग यांनी मंगळवारी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 04:23 IST

संबंधित बातम्या