मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही ! मध्य प्रदेशातील गावात झळकलं पोस्टर

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सध्या संपूर्ण देश करोना विषाणूचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सर्व जनतेने अधिकाधिक वेळ घरात राहून पोलीस व अन्य अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना मदत करावी असं आवाहन केंद्र सरकार करत आहे. ज्या भागांमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत आहे त्या भागांत केंद्र सरकार अटी व शर्थींसह उद्योगधंदे सुरु करण्यासाठी परवानगी देत आहे. मात्र देशातील काही भागात आजही जात आणि धर्मावरुन भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात भाजप आमदारांनी मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका असं जाहीर आवाहन करत त्याचं समर्थनही केलं होतं. यानंतर मध्य प्रदेशातील पेलमपूर गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही असं पोस्टर झळकलं आहे.

सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी इंडियन एक्स्प्रेसला अधिक माहिती दिली. या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत हे पोस्टर हटवलं आहे. हे पोस्टर लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poster barring entry of muslim traders in indore village surfaces case registered psd

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या