देशाच्या इतर भागाप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उष्णतेच्या लाटेचा तडाखा दिल्लीतही चांगलाच जाणवत असल्याने दिल्लीतमध्ये विजेच्या वापराचे प्रमाण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिल्लीत सध्या पाच हजार ७०० मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे. येत्या काही दिवसांतच ही मागणी ६ हजारांचा टप्पा सहज गाठणार असल्याचं चित्र आहे. दिल्ली मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिमहत्त्वाच्या – व्हीआयपी भागात भारनियमन करणे अशक्य आहे. ही सर्व परिस्थिती असतांना कोळसा तुटवडा जाणवत असल्याने वीज निर्मितीवर मर्यादा येत असल्याने दिल्लीच्या इतर भागात भारनियमन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

यासाठी दिल्ली राज्य सरकारने एक परिपत्रक काढत पुढील काही दिवसांतच विजेचा तुटवडा जावणार असल्याने लोकांना भारनियमनाला सामोरं जावे लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दिल्लीला ३० टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा करणाऱ्या दादरी -२ आणि उंचाहार या कोळशावर आधारीत वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मिती कमी केली जात आहे. त्यामुळे भारनियमनाचा फटका मेट्रो आणि रुग्णालय सेवेलाही बसू शकतो. तेव्हा यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी