हैतीत ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप; आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू

नैऋत्य हैतीत शनिवारी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरं पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Haiti
हैतीत ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप; आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू (AP Photo)

नैऋत्य हैतीत शनिवारी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरं पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. आधीच करोनाशी सामना करत असलेल्या हैतीच्या नागरिकांचं जीवन भूकंपामुळे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रपतींची हत्या आणि वाढत्या गरीबीमुळे हैती देशाचं संकट वाढत चाललं आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली. आतापर्यंत या दुर्घटनेत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे कमीत कमी ८६० घरं जमिनदोस्त झाली आहेत. तर ७०० हून अधिक घरांना तडे गेले आहेत. नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश पंतप्रधान एरियल हेनरी यांनी दिले आहेत. तसेच देशात १ महिना आपतकालीन स्थितीची घोषणा केली आहे.

करोनाची तिसरी लाट?; बंगळुरूनंतर ओडिशामध्ये एका दिवसात १३८ मुलांना संसर्ग

दुसरीकडे पुढच्या आठवड्यात हैतीवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Powerful magnitude 7 2 earthquake struck southwestern haiti 304 people death rmt

ताज्या बातम्या