scorecardresearch

प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ

राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्ले यांनी सावंत यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांना शपथ दिली.

पणजी : गोवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४० सदस्यांच्या सभागृहात २० जागा जिंकणाऱ्या भाजपचे नेतृत्व करणारे आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले प्रमोद सावंत यांचा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.  पणजीनजीकच्या बांबोलिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या समारंभात राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्ले यांनी सावंत यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांना शपथ दिली. १० हजाराहून अधिक लोक या कार्यक्रमाला हजर होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मूळचे गोवेकर असलेले हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे निवडणूक प्रभारी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी  उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pramod sawant sworn in as goa chief minister for the second time zws

ताज्या बातम्या