प्रशांत भूषण यांचा माफिनामा

महाधिवक्ते जी.ई.वहानवटी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालय कचरत असल्याचे विधान केलेल्या प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयची माफी मागितली आहे.

महाधिवक्ते जी.ई.वहानवटी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालय कचरत असल्याचे विधान केलेल्या प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयची माफी मागितली आहे.
प्रशांत भूषण यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या विधानावर भावना दुखावल्याची प्रतिक्रिया न्यायाधीश आरएम लोढा यांनी व्यक्त केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा किंवा न्यायाधीशांना दुखाविण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.
भूषण यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलाने असे विधान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे लोढा यांनी सांगितले होते.मात्र, आता भूषण यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prashant bhushan apologises to supreme court