निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होण्यावर अजूनही सस्पेंस कायम आहे. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सीडब्ल्यूसी सदस्य हरीश रावत यांनी याबाबत भाष्य केले आहे. प्रशांत किशोरने आधी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून सामील व्हावे, त्याचे स्वागत आहे. त्यानंतर त्याने ज्ञान द्यावे असा खोचक टोला हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांना लगावला आहे. पक्षात सामील झाल्यानंतरही काँग्रेसने त्यांच्या पद्धतीने काम करावे असा त्यांचा आग्रह असू शकत नाही. पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा गुलाम असू शकत नाही असेही रावत यांनी म्हटले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यावर भाष्य केले आहे. तसेत तृणमूलबाबत बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आमिष दाखवून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी जे काम करत आहेत त्यावरून विरोधी एकजूट मजबूत होणार नाही, असे म्हटले आहे.

प्रशांत किशोरबाबत विचारले असता रावत म्हणाले, “भारताचा नागरिक असलेला आणि स्वातंत्र्य चळवळीवर आणि काँग्रेसवर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती पक्षात सामील होऊ शकते असे म्हटले आहे. “प्रशांत किशोरही पक्षात येऊ शकतात. आम्ही नेहमी नवीन कल्पनांना जागा देतो. पण पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. जरी तो एक अतिशय सक्षम व्यक्ती आहे, परंतु आम्ही असे म्हणू शकत नाही की बाबा, तुम्ही आता सर्व काम सांभाळा, मी काहीही करणार नाही,” असे हरीश रावत म्हणाले.

हरीश रावत म्हणाले की, पक्षात प्रत्येकाची स्वतःची भूमिका असते. प्रशांत किशोर यांना हवे असल्यास ते पक्षात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचे स्वागत आहे. पण आम्ही आमचे संविधान आणि परंपरा पाळू. हे अगदी स्पष्ट आहे.

“प्रत्येकाला माहित आहे की प्रशांत किशोर त्याच्या क्षेत्रात जाणकार आहे आणि त्याचा काँग्रेसलाही फायदा होऊ शकतो पण पक्षात कोणाला तरी घेण्याचा एक मार्ग आहे. त्यांनाही अशाच प्रकारे पक्षात यावे लागेल. प्रथम तो सदस्य होईल, त्यानंतरच त्याला जबाबदारी दिली जाईल. आधी त्यांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे आणि त्यानंतरच त्यांनी पक्षाच्या निर्णयांवर भाष्य करावे,” असे रावत म्हणाले.