पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात भाजपाची साथ सोडत राजदसोबत सत्ता स्थापन केली. भाजपावर पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून नितीश कुमारांनी भाजपाला राज्यातील सत्तेबाहेर ठेवलं. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावरून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर टीका करत होते. त्यानंतर बुधवारी प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यादव यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे प्रशांत किशोर पुन्हा विरोधी पक्षासाठी काम करणार असल्याची चर्चा आहे.

तुमची नजर २०२४ साली तुम्ही बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर आहे का? लोकसभा निवडणुकीवर, असा सवाल एका वृत्तवाहिनीने प्रशांत किशोर यांनी विचारला. त्यावर “मी कोणताही पक्ष स्थापन केला नाही आहे. फक्त जनसुराज्य नावाचे अभियान चालवत आहे. ज्याच्यामाध्यमातून बिहारमधील लोकांचे प्रश्न मी समजून घेत आहे.”

“लोकांसोबत चर्चा करून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणार आहे. जर पक्ष स्थापन केला तर त्याचा भाग अथवा नेता सुद्धा होणार नाही. राजकारणात काहीतरी करू इच्छिणाऱ्यांना पुढे आणणे हा आपला उद्देश आहे,” असेही प्रशांत किशोर यांनी म्हटलं. ते आज तक या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

‘या’ अटीवर करू शकतात युती

सुत्रांनी सांगितल्यानुसार, प्रशांत किशोर यांनी महाआघाडी सोबत जाण्यासाठी एक अट ठेवली आहे. नितीश कुमार बिहारमध्ये १ वर्षांत १० लाख लोकांना रोजगार देतील, तर ते महाआघडीत जाण्याबाबत विचार करू शकतात. दरम्यान, नितीश कुमार यांच्यासोबत भेट झाल्याचं प्रशांत किशोर यांनी मान्य केलं आहे. पण, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.