प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची सोडली साथ; पदाचा दिला राजीनामा

ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना धक्का; मुख्य राजकीय सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी दिला राजीनामा

Prashant Kishor, Prashant Kishor resigns, Prashant Kishor resigns, Capt Amarinder Prashant Kishor, Punjab Assembly election, Punjab news
प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आगामी काळात काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहे. राजकीय वर्तुळात काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असतानाच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडली आहे. प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यापासून रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची केंद्रीय राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान दिलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा देणारीच वृत्त आता समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यानं अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.

अहमद पटेलांच्यानंतर काँग्रेसला रणनीतीकार भेटणार?; सोनिया गांधी लवकरच घेणार निर्णय

सार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवी असल्याचं कारण देत प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. “सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करावे”, असं प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

‘भविष्यातील वाटचाल’चा अर्थ काय?

गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. विशेषतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली त्यांची बैठक चर्चेचा विषय ठरली. या बैठकीपासूनच प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जाऊ लागलं. ते अधिक गडद होताना दिसत आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं पद हवं असून, त्यांनी काही सूचनाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे फेरबदलांबद्दल केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी असा तर प्रशांत किशोर यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दलच्या म्हणण्याचा अर्थ नाही ना? अशी कुजबूज सुरू झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prashant kishor resigns prashant kishor resigns as principal advisor to punjab cm capt amarinder singh bmh

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या