Premium Petrol Price Hike latest impact on vehicle owners and current fuel market trends : जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. तेल कंपन्यांनी आज प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, नियमित वापरल्या जाणाऱ्या साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी २० मार्चपासून भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात २.३५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बीपीसीएलच्या (BPCL) ‘स्पीड’, एचपीसीएलच्या (HPCL) ‘पॉवर’ आणि आयओसीएलच्या (IOCL) ‘XP95’ पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.०९ रुपये ते २.३५ रुपयांची वाढ झाली आहे. तर, सध्या साध्या पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे जगातील २०% तेल आणि वायू वाहतूक करणारा ‘होर्मुझची समुद्रधुनी’ जवळपास बंद झाली असून पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. एचपीसीएल (HPCL) प्रशासनाने पेट्रोल पंप मालकांना ‘पॉवर ९५’ च्या दरात २ रुपयां वाढ झाल्याचे कळवले असून नवीन दर लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नियमित इंधन दरात कोणताही बदल नाही
दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये आज नियमित इंधनाच्या पेट्रोल दरात कोणताही बदल झालेला नाही आणि ते स्थिर आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरता असूनही, धोरणात्मक बाबी आणि महागाईच्या चिंतेमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दीर्घ काळापासून मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत. एकूण इंधन वापरामध्ये प्रीमियम पेट्रोलचा वाटा कमी असल्याने, तेल कंपन्यांना सर्वसामान्य जनतेवर परिणाम न करता किमती समायोजित करण्यास काही वाव मिळतो.
| शहर | अंदाजे प्रीमिअम पेट्रोल किंमत (प्रती लिटर/रुपये) |
|---|---|
| नवी दिल्ली | १०५ ते १०७ |
| मुंबई | ११३ ते ११५ |
| पुणे | ११३.७७ |
| बंगळुरू | ११२ ते ११४ |
| चेन्नई | ११० ते ११२ |
| हैदराबाद | ११७ ते ११९ |
