झारखंडमधील बोकारो या औद्योगिक शहरापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मर्रह या २ हजार लोकवस्ती असलेल्या दुर्गम गावात. जवळपास ७०० बंगाली कुटुंब राहतात. या गावात मागील जवळपास ३०० वर्षांपासून दुर्गापुजा करण्याची परंपरा आहे.

येथील घोष कुटंबाकडून या पुजेचे आयोजन केले जाते. या ठिकाणची मुर्ती अत्यंत दुर्मिळ असून, ही पुजा पारंपारिक पद्धतीने केली जाते.दरवर्षी या पुजेसाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात, मात्र यंदा करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेककजण या ठिकाणी येऊ शकत नाहीत. शिवाय, यंदा नेहमीप्रमाणे पुजेचे आयोजन करण्याची शक्यता देखील धुसरच होती.

मात्र, या कुटुंबाने ते स्वतः उपस्थित नसूनही त्यांची पारंपारिक दुर्गापुजा करण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली. अन्य गावांप्रमाणे विजेची समस्या व नेटवर्कची अडचण असलेल्या या गावात आता, वायफाय कनेकश्न असणार आहे. येथील ज्येष्ठ मंडळींना यंदाची पुजा ऑनलाईन पाहता यावी यासाठी वायफाय बसवलं जात आहे.

ज्या गावात दहा तासांपेक्षा कमी वेळासाठी वीज येत होती आणि अगोदर जनरेटरच्या सहाय्याने पुजा पार पडत होती. त्या ठिकाणी वायफाय बसवणे हा एक मोठा तांत्रिक बदल होता.

ऑनलाइन पुजेची कल्पना मांडणाऱ्या प्रतिका दत्ता म्हणाल्या, एकदा तुम्ही दुर्गापुजा सुरू केली, तर तिच्यात एकाही वर्षी खंड पाडता येत नाही. अनेक आमची दुर्गापुजा पाहण्यासाठी वर्षभरापासून उत्सुक असतात. कधीकधी त्यांना आपला नवस देखील फेडायचा असतो. यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही अशाप्रकारे दुर्गापुजा दाखवण्याचा यंदा विचार केला आहे.

घोष कुटुंबाकडून गावात सर्वप्रथम वायफाय आणण्यासाठी प्रयत्न केला गेला. यासाठी ३०० मीटर वायर लागले. त्यांनी वायरचा व यासाठी बसवल्या गेलेल्या राउटरचा खर्च देखील उचलला. शिवाय, ग्रामस्थांना ही सुविधा कशी वापरावी याची माहिती देखील माहिती दिली.